ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१-२२
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सातव्या सत्रातील कृषी पदवीच्या एकूण ५२ विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत अभिमुखता कार्यक्रम हा कृषी महाविद्यालयाचे सहयोगी आधिष्ठता व प्राचार्य डॉ. बी.व्ही.आसेवार यांच्या अध्येक्षते खाली दि .३० जुलै २०२१ रोजी संपन्न झाला. ह्यात डॉ. बी.व्ही.आसेवार यांनी विद्याथ्यानं (ऑनलाईन प्लॅटफॉर्म चा वापर करून ) ग्रामीण कृषी कार्यानुभव बाबतचे मार्गदर्शन व महत्व पटवून देऊन हा कार्यक्रम शैक्षणिक दृष्ट्या कसा महत्वाचा आहे त्याचे महत्व विशद केले. हा कार्यक्रम यशश्वी करण्यामागे सर्व विषय तज्ज्ञ यांनी देखील आपला विषयाची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्र .र.देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम यशश्वी रित्या पार पडला.