कृषी महाविद्यालय गोळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रक्तदान शिबिर
कृषी महाविद्यालय गोळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते ,या कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बी. व्हि. आसेवार् सर अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्ह्या शल्य चिकित्सक ,कार्यलयाच्या रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी श्री.नरवाडे तसेच चमुतील सहकारी श्री.गिरी व श्री हांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी डॉ. संतोष पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना मधून व्यक्तिमतत्त्व विकास व रक्तदान कार्यक्रम विषयी थोडक्यात प्रस्तावना सादर केली. तदनंतर प्राचार्य डॉ आसेवर सर यांनी अध्यक्षीय भाषणात रक्त दान हे सर्व श्रेष्ठ दान म्हणून अधोरेखित केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना तील स्वयंसेवक प्रध्यापक व कर्मचारी वृंद यांना कोरोना काळात रक्ताचे किती मोठे योगदान होते याचे महत्व विषद करून सर्वांना रक्तदान करण्याचे आव्हान केले.
प्रमुख पाहुणे श्री. नरवाडे यांनी त्यांच्या मनोगतात सध्याच्या परिस्थितीत रक्तदान ही काळाची गरज कशी आहे त्या अनुषंगाने त्यांनी हिंगोली जिल्ह्याची रक्त साठा व सद्द परीस्थिती आकडेवारी सह रक्ताचे महत्व विषद केले. कार्यक्रम सूत्रसंचालन डॉ पी आर देशमुख यांनी केले. उपप्राचार्य डॉ शिवाजी शिंदे, प्रा. नागनाथ कुरा-डे सर, डॉ सुभाष ठोंबरे यांनी कार्यक्रम यशस्वी केला. प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी यांनी राष्ट्रीय सेवा स्वयंसेका बरोबर रक्तदान केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पुंडलिक वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले. .
No comments:
Post a Comment