Sunday, 4 September 2022

Independence Day

 आजादी का अमृत महोत्सवी भारताचा 'स्वतंत्र दिन' कृषी महाविद्यालय, गोळेगाव येथे उत्साहात साजरा.


गोळेगाव (हिंगोली) : दिनांक 15 ऑगस्ट रोजी कृषी महाविद्यालय गोळेगाव च्या प्रांगणावर ७६ वा स्वातंत्र्य दिन कृषी महाविद्यालयाचे विद्यमान सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. भगवान आसेवार यांच्या शुभहस्ते  ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रक्षेत्र अधीक्षक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

आजादी का अमृत महोत्सव प्रसंगी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वप्रथम खुली रांगोळी स्पर्धा घेण्यात आली आणि त्यामधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. 

यानंतर, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रीन क्लबच्या वतीने समिश्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभक्तीपर विवेचन, भाषण, कविता सादरीकरण आणि नृत्य सादरीकरण घेण्यात आले.

याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शिवाजी शिंदे, प्रा. नारायण कुराडे, प्रा.  सदाशिव शिंदे, प्रा. ए आर मंत्री, प्रा. अनंत ब्याळे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सुभाष ठोंबरे, डॉ. प्रदीप राठोड, डॉ. दशरथ सारंग, डॉ. रोडगे, श्री घाडगे, श्री खटींग, श्रीमती हवालदार, श्रीमती महावलकर, श्री पारस पवार, श्री जाधव, श्री बाबुराव खुडे, श्री देवलाल पवार व सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे नियोजन सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ बी. व्ही. आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पि.के. वाघमारे यांनी केले असून या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ग्रीन क्लब, कृषी महाविद्यालय, गोळेगावचा खूप मोठा वाटा असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीन क्लबचा विद्यार्थी प्रतिनिधी प्रताप उंबरे तर उपस्थित मान्यवरांचे आभार कु. शितल गरुड या विद्यार्थिनींनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








No comments:

Post a Comment