Thursday, 15 June 2023

कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे विद्यार्थी-पालक मेळावा संपन्न

 कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे विद्यार्थी-पालक मेळावा संपन्न









कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे विद्यार्थी-पालक मेळावा संपन्न

औंढा नागनाथ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे दिनांक १३.०६.२०२३ रोजी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. बी. व्ही. आसेवार, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषि महाविद्यालय, गोळेगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वनाथ झुंजारे, पोलीस निरिक्षक, औंढा यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते...

मेळाव्यास मार्गदर्शन करताना श्री विश्वनाथ झुंजारे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे, व्यायाम व शिस्तीचे तसेच विवेकपूर्ण वागणूकीचे महत्व पटविले. तसेच या गोष्टी टाळल्यास होणारे गंभीर परिणामही सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी पालकांना या महाविद्यालयाची विद्यार्थ्याप्रति असणारी आस्था थोडक्यात विषद केली तसेच विद्यार्थ्याच्या सोयीसाठी मुलांचे तसेच मुलींचे वस्तीगृह व महाविद्यालय ते औंढा नेआण करण्यासाठी नविनच घेतलेल्या बसकडे सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रम प्रसंगी श्री पी. के. राठोड यांनी प्रास्ताविक केले व कृषि महाविद्यालय, गोळेगावची स्थापनेपासून आजतागायत झालेल्या वाटचालीविषयी सादरीकरणाद्वारे सर्वाना अवगत केले. सुत्रसंचालन डॉ. एस. एन. देवकुळे तर आभारप्रदर्शन श्री आर. व्ही. भालेराव यांनी केले..

या कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील डॉ. एस. जी. नरवाडे, प्रा. जे. एन. ब्याळे, डॉ. एस. एन. देवकुळे, डॉ. आर. व्ही. भालेराव, डॉ. आर. एफ. ठोंबरे, डॉ. जी. पी. जगताप, श्री. जि. बी. उबाळे, श्रीमती एस. डी. हवालदार, श्री. डी. एन. जोंधळे, श्री. गणेश नाईक, श्री. बी. आर. खुडे, शेख सलीम, श्री. चंद्रकांत ताटीकोंडलवार, श्री. मारोती गुहाडे, श्री. बी. एम. खडे, श्री. पी. बी. हंबर्डे, श्रीमती रंजना बुरकुले श्रीमती महानंदा भिसे आदिनी ने परिश्रम घेतले.

सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषि महाविद्यालय, गोळेगाव


No comments:

Post a Comment