Thursday, 7 May 2020

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०१९ - २०

कृषी शिक्षणामध्ये ग्रामीण कृषी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे आणि याच अनुषंगाने पदवी पूर्व कृषी शिक्षणामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्व आहे. कृषी महाविद्यालय गोळेगाव येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना "प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र वसमत: अंतर्गत वसंमत नजीक असलेल्या मौजए वखारी, टाकलगाव आणि थोरवी या तीन गावांमध्ये माहे जून ते आक्तोबर २०१९ दरम्यान पाठवण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे नियोजन मा. सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ डी. बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ सुनील ऊमाटे व कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनावर यांनी प्रभारी अधिकारी डॉ सुरेश कौशल्ये यांच्या समवेत केले. 
उपरोक्त कार्यक्रमांतर्गत खालील नमूद कामे पूर्ण करण्यात आली.  
१.  कीड व्यवस्थापन : गुलाबी बोडआळी व लक्षरी आळीचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी दि. १२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान कामगंध सापळ्यांचे वाटप, प्रात्यक्षिक व मार्गदर्शन तिन्ही गावांमध्ये करण्यात आले. 
२.  वृक्ष लागवड : तीन गावामध्ये मिळून एकूण ४०० विविध फळ पीक व सदाहरित वृक्षांची लागवड कृषी दिनाचे औचित्य साधून व व्रुक्षदिंडी द्वारे प्रति विद्यार्थी पाच झाडांची शाळा व मंदिर परिसरात लागवड करण्यात आली. 



वृक्ष लागवड व वृक्ष दिंडी

 ३. जनावरांचे लसीकरण: पावसाळ्यात हॊणाऱ्या विविध आजारांचे महत्व जाणून शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. या  कार्यक्रमणतर्गत एकूण ७४५जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

जनावरांचे लसीकरण
 ४. जलसंधारण व जलयुक्त शिवार: जलसंधारणाचे महत्व शेतकरयांना पटवून देतांना जलसंधारणाच्य विविध पद्धती व प्रक्रियांबाबत शेतकऱ्याना सविस्तर माहिती देण्यात आली. तसंच शेततळ्यास भेट देऊन विविध तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. 
 ५. बियाणे प्रक्रिया व उगवण शक्ती तपासणी :  "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्ती प्रमाणे बीज प्रक्रियेचे महत्व शेतकरयांना पटवून देण्यात आले. या उपक्रमांतर्गत तीन गावांमध्ये एकूण १२ बीज प्रक्रियांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोयाबीन पिकाची उगवण क्षमता तपासणी  करण्यासाठीची पद्धत करून दाखविण्यात आली. 


बीज परीक्षण व बियाणे उगवण क्षमता तपासणी
६. माती परीक्षण :  शेतीमधील खात व्यवस्थापनाचे महत्व सांगताना माती परीक्षणाचे महत्व विशद करण्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति शेतकरी याप्रमाणे एकूण ५४ शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देण्यात आले. 

माती परीक्षण
७. प्रात्यक्षिके: पीक संवर्धन व मशागती बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासंबंधी विविध ७० प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. 
८. तंत्रज्ञान प्रसार : शेती तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी गावांमध्ये कृषी वार्ताफलक हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत कृषी वार्ता फलकद्वारे कृषी तंत्रज्ञानावरील लेखांचे वाचन करण्यात आले. तसेच चरच्या सत्राचे आयोजन करण्यात आले.  
९. इतर कार्यक्रम:  या शिवाय गावांमध्ये विद्यार्थांनी गावकऱ्यासोबत आषाडी, पोळा व, नागपंचमी इत्यादी सण साजरे केले. 

Thursday, 21 June 2018

Celebration of 4th International YOGA Day at college of Agriculture,Golegaon.






Yoga is among India’s most popular cultural exports. People across the globe have adopted the ancient practice for its physical, mental and spiritual benefits. But along the way, yoga has morphed and been adapted to suit the modern gym-going public, leading some yogis to voice concern that it has become little more than a series of stretching exercises, divorced from its roots as a meditative discipline.
Celebration of 4th International YOGA Day at college of Agriculture, Golegaon under the supervision of Dr.D.B.Devsarkar , Associate Dean & Principal College of Agriculture, Golegaon, Dr S.M.Umate, Dr.N.G.Kurhade, Dr.Harish Awari, Prof.V.S.Bastewad, Dr.V.S.Manvar, Dr.F.S.Khan, Dr P.K.Rathod, Dr S.R.Wankhede.

"रावे" कार्यक्रमांतर्गत विदयार्थी करणार तंत्रज्ञान प्रसार 

कृषी महाविद्यालय गोळेगाव अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) उपक्रमाच्या उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन  दिनांक २० जून  २०१८ रोजी करण्यात आले. सातव्या सत्राचे ५० कृषिदुत व कृषिकन्या औंढा नागनाथ तालुक्यामधील माथा या गावामधील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान पोहचविणार आहेत. उपरोक्त कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे गट बनविण्यात आले आहेत. या गावांमध्ये कृषी तंत्रज्ञान प्रसाराबरोबरच शेतकऱ्यांचे अनुभव आणि समस्या जाणून घेणार असल्याची माहिती सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, डॉ. डी. बी. देवसरकर यांनी दिली. 
 कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थाना शेतकरी जीवनाची ओळख व्हावी, त्यांच्या अडीअडचणी समजाव्यात, तसेच नवीन कृषी तंत्रज्ञान शेतकरयांपर्यंत पोहंचवता यावे यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम राबिवला जातो. या अंतर्गत विद्यापीठातील वसमत येथील प्रादेशिक ऊस संशोधन केंद्राचे तज्ज्ञदेखील मार्गदर्शन करणार आहेत. 
यंदा विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध विषयांवरील मोबाईल ऑप्सच्या वापराबाबत कृषिदुत व कृषिकन्या शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. या पूर्ण सत्रामध्ये कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी संबंधित विभागातील कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी उद्योगांना भेटी देणार आहेत. याशिवाय बीजप्रक्रिया, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण,तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन, गट चर्च्या, शेतकरी मेळावा, व्याखाने आणि शीवारफेरीचे आयोजन करणार आहेत. 
शेतकरयांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुकुटपालन आदी विषयावर तज्ज्ञ गावात जाऊन माहिती देणार आहेत असे डॉ.  देवसरकर यांनी सांगितले. 
कार्यक्रमांतर्गत डॉ. विद्यानंद मनवर, कार्यक्रम अधिकारी यांनी रावे कार्यक्रमाची रुपरेशा विशद केली. या कार्यक्रमादरम्यान डॉ. सुनील उमाटे, सहयोगी प्राध्यापक, श्री. नारायण कुऱ्हाडे, सहयोगी प्राध्यापक, डॉ. हरीश आवारी, सहयोगी प्राध्यापक, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. फरिया खान, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. श्रुती वानखेडे डॉ. अभय जाधव, श्री. महेश तनपुरे या विषय तज्ञांनी संबंधित विषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थाना केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.