Sunday, 1 May 2022

राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थीत गोळेगाव महाविदयालय इमरतीचे उदघाटन


राज्याचे
 कृषिमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थीत गोळेगाव महाविदयालय इमरतीचे उदघाटन








 

Tuesday, 31 August 2021

ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१-२२

 ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१-२२



शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या सातव्या सत्रातील कृषी पदवीच्या एकूण ५२ विद्यार्थ्यांचे  ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत  अभिमुखता कार्यक्रम हा कृषी महाविद्यालयाचे सहयोगी आधिष्ठता व प्राचार्य  डॉ. बी.व्ही.आसेवार यांच्या अध्येक्षते खाली  दि .३० जुलै २०२१ रोजी संपन्न झाला. ह्यात डॉ. बी.व्ही.आसेवार यांनी  विद्याथ्यानं (ऑनलाईन प्लॅटफॉर्म चा  वापर करून ) ग्रामीण कृषी कार्यानुभव बाबतचे मार्गदर्शन  व महत्व पटवून देऊन हा कार्यक्रम शैक्षणिक दृष्ट्या कसा महत्वाचा आहे  त्याचे महत्व विशद केले. हा कार्यक्रम यशश्वी करण्यामागे सर्व विषय तज्ज्ञ यांनी देखील आपला विषयाची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रम अधिकारी डॉ. प्र .र.देशमुख  यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम यशश्वी रित्या पार पडला.

 


 Health Camp was organized by Sparks Life Care Mumbai & in association with Associate Dean & Principal Dr. B.V. Asewar College of Agriculture, Golegaon on 24th August 2021.In camp health checkup of all staff members was done.

74th Independence day






Celebrated 74th Independence day at College of Agriculture, Golegaon in presence of Associate Dean and Principal Dr. B.V. Asewar  and all staff member of College of Agriculture, Golegaon.

Thursday, 7 May 2020

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०१९ - २०

कृषी शिक्षणामध्ये ग्रामीण कृषी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे आणि याच अनुषंगाने पदवी पूर्व कृषी शिक्षणामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्व आहे. कृषी महाविद्यालय गोळेगाव येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना "प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र वसमत: अंतर्गत वसंमत नजीक असलेल्या मौजए वखारी, टाकलगाव आणि थोरवी या तीन गावांमध्ये माहे जून ते आक्तोबर २०१९ दरम्यान पाठवण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे नियोजन मा. सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ डी. बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ सुनील ऊमाटे व कार्यक्रम अधिकारी डॉ विद्यानंद मनावर यांनी प्रभारी अधिकारी डॉ सुरेश कौशल्ये यांच्या समवेत केले. 
उपरोक्त कार्यक्रमांतर्गत खालील नमूद कामे पूर्ण करण्यात आली.  
१.  कीड व्यवस्थापन : गुलाबी बोडआळी व लक्षरी आळीचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी दि. १२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान कामगंध सापळ्यांचे वाटप, प्रात्यक्षिक व मार्गदर्शन तिन्ही गावांमध्ये करण्यात आले. 
२.  वृक्ष लागवड : तीन गावामध्ये मिळून एकूण ४०० विविध फळ पीक व सदाहरित वृक्षांची लागवड कृषी दिनाचे औचित्य साधून व व्रुक्षदिंडी द्वारे प्रति विद्यार्थी पाच झाडांची शाळा व मंदिर परिसरात लागवड करण्यात आली. 



वृक्ष लागवड व वृक्ष दिंडी

 ३. जनावरांचे लसीकरण: पावसाळ्यात हॊणाऱ्या विविध आजारांचे महत्व जाणून शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. या  कार्यक्रमणतर्गत एकूण ७४५जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

जनावरांचे लसीकरण
 ४. जलसंधारण व जलयुक्त शिवार: जलसंधारणाचे महत्व शेतकरयांना पटवून देतांना जलसंधारणाच्य विविध पद्धती व प्रक्रियांबाबत शेतकऱ्याना सविस्तर माहिती देण्यात आली. तसंच शेततळ्यास भेट देऊन विविध तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. 
 ५. बियाणे प्रक्रिया व उगवण शक्ती तपासणी :  "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या उक्ती प्रमाणे बीज प्रक्रियेचे महत्व शेतकरयांना पटवून देण्यात आले. या उपक्रमांतर्गत तीन गावांमध्ये एकूण १२ बीज प्रक्रियांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोयाबीन पिकाची उगवण क्षमता तपासणी  करण्यासाठीची पद्धत करून दाखविण्यात आली. 


बीज परीक्षण व बियाणे उगवण क्षमता तपासणी
६. माती परीक्षण :  शेतीमधील खात व्यवस्थापनाचे महत्व सांगताना माती परीक्षणाचे महत्व विशद करण्यासाठी प्रति विद्यार्थी प्रति शेतकरी याप्रमाणे एकूण ५४ शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देण्यात आले. 

माती परीक्षण
७. प्रात्यक्षिके: पीक संवर्धन व मशागती बाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासंबंधी विविध ७० प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. 
८. तंत्रज्ञान प्रसार : शेती तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी गावांमध्ये कृषी वार्ताफलक हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत कृषी वार्ता फलकद्वारे कृषी तंत्रज्ञानावरील लेखांचे वाचन करण्यात आले. तसेच चरच्या सत्राचे आयोजन करण्यात आले.  
९. इतर कार्यक्रम:  या शिवाय गावांमध्ये विद्यार्थांनी गावकऱ्यासोबत आषाडी, पोळा व, नागपंचमी इत्यादी सण साजरे केले.